24 August 1965 - 13 May 2018
" दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती "
जे भव्य दिव्य असते त्या पुढे नेहमीच नतमस्तक व्हावेसे वाटते.ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीला योग्य तो प्रतिसाद देणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. शिक्षणातून समाजाची प्रगती होत असते हा ध्यास घेऊन त्यांनी आपल्या परिसरातील सर्वसामान्य गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्यासाठी १९९९ साली कै.नारायणराव चोंधे पाटील शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून विद्या विनय निकेतन विद्यालय ही मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली .अवघ्या १६ विद्यार्थ्यांवर चालू झालेल्या या शाळेत आज बालवाडी ते दहावीपर्यंतचे वर्ग मिळून १७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.हे सर्व घडलेले पाहताना त्यांना संकल्पित स्वप्न सत्यात उतरल्याचे मनस्वी खूप समाधान वाटत होते. आज ते या जगात नाहीत परंतु त्यांनी निर्माण केलेले शैक्षणिक संकुल उत्तम व दर्जेदार पद्धतीने चालवताना त्यांची पुढची पिढी म्हणून आम्हाला खूप आनंद होतो.
विशालनगर, पिपंळे निलख, कस्पटेवस्ती हा नव्याने विकसित होणारा भाग होता. सामान्य मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी त्या भागात एका शाळेची गरज होती. माझे पती स्वर्गीय सुरेशराव चोंधे यांचे ते स्वप्न होतं म्हणून १९९९ साली कै.नारायणराव पाटील शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून विद्या विनय निकेतन विद्यालयाची स्थापना केली. मराठी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली. सुरुवातीच्या काळात या संस्थेची सचिव म्हणून काम पाहताना खूप अडचणी आल्या परंतु, चांगल्या शाळेचा ध्यास पाठीशी होता तो पूर्ण करण्यासाठी त्या सर्व अडचणीवर मात केली आणि त्याचेच फलित म्हणून विद्या विनय निकेतन विद्यालय हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे एक शैक्षणिक संकुल आहे. अशी त्याची ख्याती झाली आणि हे सर्व पाहताना आणि ऐकताना आनदं होत आहेआणि समाधान वाटत आहे.
सर्व सामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा असावी, नंतर वडिलांच्या हयाती मध्ये त्यांनी ते स्वप्न पूर्ण केले .२०१८ साली त्यांच्या निधनानंतर सहाजिकच ती जबाबदारी माझ्यावर आली. ही जबाबदारी तितक्याच ताकदीने समर्थपणे पार पाडण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन मी प्रयत्न करत आहे. आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत आणि हे शतक विज्ञान व तंत्रज्ञानाचे शतक आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे पारंपारिक नोकरी व्यतिरिक्त नोकरीच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होत आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी तशा प्रकारचे विद्यार्थी घडवणे आणि त्या प्रकारचे त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. म्हणून, शालेय शिक्षणाची कोणतीही चौकट न मोडता दर्जेदार शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न आहे.